वारंवार विचारले जाणारे प्रश्न
अनुदान, खर्च, परतावा आणि देखभाल याबद्दल तुमच्या प्रश्नांची उत्तरे.
घरासाठी किती kW प्रणाली लागते?
हे तुमच्या मासिक वीज वापरावर अवलंबून आहे. सहसा १ kW प्रणाली दरमहा सुमारे १२० युनिट देते. ₹२,०००–₹३,००० च्या बिलासाठी २–३ kW योग्य ठरते. अचूक क्षमता मोफत सर्व्हेनंतर ठरवली जाते.
सरकारी अनुदान किती मिळते?
PM सूर्य घर योजनेअंतर्गत १ kW ला ₹३०,०००, २ kW ला ₹६०,००० आणि ३ kW व अधिकला ₹७८,००० (कमाल) अनुदान मिळते. हे थेट बँक खात्यात जमा होते.
एकूण खर्च किती येतो आणि परतावा कधी मिळतो?
प्रति kW अंदाजे ₹६५,००० (प्रणाली प्रकारानुसार बदलतो). अनुदान वजा करून निव्वळ खर्चाचा परतावा सहसा ४–६ वर्षांत मिळतो; त्यानंतर २०+ वर्षे जवळपास मोफत वीज.
पॅनेलचे आयुष्य किती?
दर्जेदार पॅनेलचे कार्यक्षमता आयुष्य सुमारे २५ वर्षे असते, आणि त्यासोबत २५ वर्षांची वॉरंटी मिळते. इन्व्हर्टरचे आयुष्य सुमारे १०–१२ वर्षे.
देखभाल किती वेळा लागते?
वर्षातून २–४ वेळा पॅनेलची साफसफाई व तपासणी पुरेशी असते. आमच्या AMC अंतर्गत ही सेवा आम्हीच पुरवतो.
वीज बंद असताना सौर चालते का?
सामान्य ऑन-ग्रिड प्रणाली वीज बंद असताना बंद होते (सुरक्षेसाठी). वीज बंद असतानाही वीज हवी असेल तर हायब्रिड प्रणाली बॅटरीसह बसवावी लागते.
कागदपत्रे व अनुदान अर्ज कोण करतो?
आम्ही पोर्टल नोंदणीपासून महावितरण मंजुरी व अनुदान अर्जापर्यंत सर्व प्रक्रिया हाताळतो — तुम्हाला फेरफटके मारावे लागत नाहीत.